February 21, 2025
  • स्व. भैरोमल तनवानी विद्यालयात उद्योजक हनुमान भोंडवे यांचे मार्गदर्शन

वाळूजमहानगर – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवानी विद्यालयात “मी असा घडलो”या सदराअंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच अनुशंगाने मंगळवारी (ता.23) आगस्ट रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्योजक हनुमान भोंडवे यांचे मार्गदर्शन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे होत्या.
यावेळी भोंडवे यांनी सांगितले की, हल्लीच्या विद्यार्थ्यांचा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक झानाकडे जास्त कल आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही पुस्तकी ज्ञानालाच जास्त प्राधान्य देते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधले खरे गुण दडले जातात. पालकांनी विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसंच एका आदर्श विद्यार्थ्यांने केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विषयाचं प्रात्यक्षिक ज्ञान घ्यायला हवं. आज एका क्लिकवर माहिती उपलब्ध होते. पण या माहितीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, सखोल ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकांसारख्या उत्तम मार्गदर्शकांची गरज असते. हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. असेही उद्योजक हनुमान भोंडवे म्हणाले.
यावेळी पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, दिंगबर आंबेकर, प्रदीप माळी, शारदा पगारे मेघा इटणकर, शोभना गव्हाड यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *