March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.28) – वाळूज परिसरातील स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर या शाळेत एक पेड माँ के नाम, या शासनाच्या उपक्रमांतर्गत एक झाड, एक विद्यार्थी या उपक्रमाचे औचित्य साधून सोमवारी 28 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कुमार सखदेव, शिक्षण विस्तार अधिकारी विजय दुतोंडे, गंगापूर पंचायत समितीचे साधन व्यक्ती मनोज भुताळे व शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका राजश्री कदम यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, “वृक्ष आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. ते आपल्याला फळे, फुले, लाकूड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध हवा देतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.” यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना रोपण करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत जवळपास 3 हजार 500 रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समन्वयक व इयत्ता पहिली ते सातवीचे शिक्षक यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून येत होता. त्यांनी झाडांना पाणी घालून त्यांची निगा राखण्याचे वचन दिले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील पर्यावरण समितीने केले होते. समितीच्या सदस्यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होईल. तसेच, शाळेचे वातावरण अधिक सुंदर आणि आल्हाददायक होईल.”

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *