वाळूजमहानगर, ता.5 (बातमीदार) – एकोणतीस वर्षीय युवकाने काचेच्या सहाय्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमा झाला असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. वाळूज परिसरातील भर रस्त्यावर थरारक घडलेली घटना सोमवारी (ता.5) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली
बिहार राज्यातील राम बाबूलाल बलिया वय 29, असे या तरुणाचे नाव आहे. त्याने सोमवारी (ता.5,) रोजी दुपारी वाळूज परिसरातील औरंगाबाद पुणे महामार्गावरील ए एस क्लब जवळ स्वतःच्या हाताने काचेच्या साह्याने गळा कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धारदार काचेने त्याचा गळा कापला गेल्याने घटनास्थळी मोठा रक्तस्राव झाला. भर रस्त्यावर घडलेली ही थरारक घटना नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना माहिती दिल्याने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी राम बलिया याला घाटीत दाखल केले. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू असून या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे समजू शकले नाही.
