March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) -नोकरी, व्यवसाय, कामधंदा आदी वेगवेगळ्या कारणासाठी शिक्षणानंतर दूर गेलेले जरंडी येथील गावकरी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले. कित्येक वर्षापासून न भेटलेले हे वर्गमित्र एकत्र आल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सर्व जाती धर्मांच्या माणसांना एकत्र आणण्याचे निमित्त म्हणजे स्नेहसंमेलन. याच स्नेहसंमेलनाचे निमित्त पुढे करत वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटोचे एच आर प्रमुख विजय साळवे यांनी हाक दिल्याने जरंडी ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी जे नोकरी, व्यवसाय, कामधंदा, शिक्षण किंवा इतर कारणामुळे दूर गेले आणि तेथेच स्थायिक झाले. या सर्वांचा स्नेहसंमेलन (फॅमिली गेट्टुगेदर) छत्रपती संभाजीनगर येथील हिमायत बागेत रविवारी (ता.11) रोजी मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी सर्वजण लहानपणी शिक्षण घेतानाच्या आठवणीत रममान झाले होते. तर महिला मुली व मुले यांनी विविध खेळ खेळून आनंद केला. प्रीती भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यात सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.


यावेळी मंचावर मेटॅलमन ऑटोचे एच आर हेड विजय साळवे, माजी ग्रामसेवक शंखे अप्पा, काकासाहेब पवार, रामराव भाऊ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विशाल पाटील, विनोद चौधरी, संजय सुस्ते, संदीप पाटील, डॉ. गोपाळ सूर्यवंशी, राजू महाजन, दिनेश पाटील, राजू पाटील, विनोद पाटील, ललित पाटील, प्रवीण चौधरी, संजय शिंदे, स्वप्नील सवाई या सर्वानी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश राजहंस यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *