वाळूजमहानगर, ता.20- कोणावरही विसंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करून स्वावलंबी कसे राहता येईल याचे धडे विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड निवासी शिबिरातून मिळाते. असे प्रतिपादन स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक प्रिया आदाने यांनी रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंग विद्यालय व विद्याभारती विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. 16 जानेवारी ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे व गाईड जिल्हा संघटक प्रिया आधाने यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा स्काऊट संघटक संतोष सोनवणे, केंद्रप्रमुख लक्ष्मण सदभावे, दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, माजी सैनिक नानासाहेब हरकळ, शाळेचे सचिव हर्षित हरकळ, अक्षय हरकळ, डी. पी. सूर्यवंशी, स्काऊट जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, गुलाब पवार, रवींद्र तम्मेवार, अनंत पाटील यांची उपस्थिती होती.
या तीन दिवसीय निवासी शिबिरात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी तंबू सजावट, शोभायात्रा, फुडप्लाझा, लोकनृत्य या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
निवासी शिबीर असल्याने स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवणे, स्वछता करणे, स्वतः निर्णय घेणे, साहस करणे यासह अन्य गुण आत्मसात करायला मिळतात. असे प्रतिपादन माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांनी यावेळी व्यक्त केले. शनिवारी (ता.18) जानेवारी रोजी बक्षीस वितरण करून शिबिराचा समारोप करण्यात आला. शिबीर यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर अप्पासाहेब मिसाळ, गाईड कॅप्टन काशीबाई गायकवाड, संगीता मुंडकर, सागर लाड, उत्कर्ष आहेर, अप्पासाहेब सोनवणे, साईराज तांदळे, समीर पाठाण, कमलेश साबळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.