वाळूजमहानगर, (ता.8) – सोळा वर्षीय विद्यार्थीनी सोबत मैञीचा बहाणा करून तिला सिडको गार्डन बजाजनगर येथुन तिच्याच स्कुटीवर बसवुन नेत साजापुर येथील हॉटेलमध्ये बळजबरीने बलात्कार केला. तसेच यापुर्वी देखील त्याने एक ते दोन वेळा त्याच हॉटेलवर बलात्कार केला होता. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडलेली ही घटना शनिवारी (ता.7) रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यार्थिनींसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वडगाव (कोल्हाटी) येथील सोळा वर्षीय विद्यार्थीनी बजाजनगर येथे सायन्स 11 वीच्या वर्गात शिक्षण घेते.
30 डिसेंबर 2022 रोजी ती नेहमी प्रमाणे सकाळी 7 वाजता क्लासेसला बजाजनगर येथे गेली होती. ती दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास क्लासमधुन घराकडे येत असतांना सिडको गार्डनजवळ तीला तीच्या परिचयाचा मित्र कार्तीक उल्हास राठोड रा. वडगाव (कोल्हाटी) ता. जि. औरंगाबाद हा त्याचे स्कुटी मोटार सायकलवर उभा दिसला. तीला बोलावून तो म्हणाला की, आपण कॅफे किस्टल येथे जावु. तेव्हा त्यास नकार देत ती म्हणाली की, मी तुझ्यासोबत येणार नाही, तु मला फिरण्याचा बहाणा करून यापुर्वी सुध्दा माझ्यासोबत घाणेरडे प्रकार केले होते. मी येत नाही. असे म्हणाली. परंतु त्याने तीला परत- परत सांगून त्याची स्कुटी सिडको गार्डन येथे उभी करुन तिच्याच स्कुटीवर बसला व तीला साई हॉटेल, साजापूर येथे घेवून गेला. तेथे एका रूममधे त्याने तिच्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने बलात्कार केला. त्यावेळी त्यास नको नको म्हणून बराच विरोध केला परंतु त्याने न ऐकता तिच्या सोबत शाररीक संबंध केले. त्यानंतर स्कुटी मोटार सायकलवर बसवून परत सिडको गार्डन बजाजनगर येथे संध्याकाळी 5 वाजता सोडले. ती घरी गेली तेव्हा तिचे आई- वडील हे गावाकडे गेले होते. त्यामुळे ही घटना त्यांना सांगितली नाही.
त्यानंतर सुध्दा त्रास –
घटनेची वाच्यता न झाल्याने आरोपीची हिम्मत बळावली. त्यामुळे कार्तीक राठोड हा तिला त्यानंतर मेसेस करुन त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळुन ती घरात रडत बसत होती. त्यामुळे तिच्या भावाने आई-वडीलांना घरी बोलावुन घेतले. तेव्हा त्यांना तिने घडलेली हकीकत सांगीतली. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तीक उल्हास राठोड रा. वडगाव (कोल्हाटी) बजाजनगर याच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे घेत आहे.
