वाळूजमहानगर, (ता.27)- टॉयलेटला गेलेल्या एका 16 वर्षीय मुलीचे कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी तिला फुस लावून तिचे अपहरण केले. ही घटना तुर्काबाद शिवारातील मनिषा कंपनीच्या बांधकामालगत असलेल्या लेबर कँप जवळ रविवारी (ता.26) जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असलेल्या तांडा वाडी येथील सुनिल तेरसिंग रावत, (वय 40) हे कुटुंबासह तुर्काबाद (खराडी) शिवारातील ऑर्चिड कंपनी समोरील मनिषा कंपनीच्या बांधकामालगत असलेल्या लेबर कँप येथे राहतात. रविवारी (ता.26) जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास रावत यांची मोठी मुलगी रिना सुनिल रावत ही टॉयलेटला जाणेसाठी रोडच्या पलीकडे गेली होती. ती बराचवेळ झाला तरी आली नसल्याने तिची वाट पाहुन तिचा शोध घेतला असता, ती मिळुन आली नाही. तसेच ती अद्यापही घरी आली नाही. रावत यांनी त्यांच्या जवळचे नातेवाईकांकडे विचारपुस केली. परंतु असता काहीही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी सुनील राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 137 (2) बीएएलएस प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दशरथ खोसरे करीत आहे.
अपहरणातील मुलीचे वर्णन असे –
नाव रिना सुनिल रावत, वय 16 वर्षे, रंग गोरा, केस काळे व मोठे, बांधा सडपातळ, उंची पाच फूट दोन इंच, अंगात हिरव्या निळ्या फिक्कट रंगाचा पंजाबी ड्रेस, नाकात मोरणी, पायात पांढऱ्या रंगाचा शूज, हिंदी भाषा बोलते.
