वाळूजमहानगर, (ता.9) – सोळा वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटी असल्याचा व तीच्या भोळसर पणाचा गैरफायदा घेवून संशयित दुधवाल्याने घराचे दार आतुन बंद करून तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. व स्वतःचा मोबाईल क्रमांक वहीवर लिहूण तो घरातून पळून गेला. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्याला जेरबंद केले. ही अत्यंत खळबळ जनक घटना बुधवारी (ता.8) रोजी सकाळी 11:40 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड जिल्हा, तालुका मुदखेड येथील 35 वर्षीय महिला, तिचा 20 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलगी रांजणगाव (शेणपुंजी) ता गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे किरायाच्या खोलीत राहतात. तिचा पती आजारी असल्याने तो गावाकडेच असतो. वाळुज औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपनीत ती व तिचा मुलगा काम करतात. तर सोळा वर्षीय मतिमंद मुलगी घरीच असते. बुधवारी (ता.8) रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना व मतिमंद मुलगी घरी एकटीच असताना संशयित आरोपी दूधवाला बोराडे हा घरात आला. व दरवाजा बंद करून त्याने सोळा वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. जाताना त्याने तीला एका वहीच्या पानावर मोबाईल नंबर लिहून दिला. शेजारी राहणाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिने तिच्या आईला फोन करून माहिती दिली. बुधवारी घडलेल्या या खळबळ जनक घटनेमुळे महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांना सांगावे कसे. या विवंचनेत ती परत घरी गेली. गुरुवारी (ता.9) रोजी सकाळी पुन्हा पीडित मुलीची आई व भावाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या करीत आहे.
आरोपी तात्काळ जेरबंद –
दरम्यान त्याने लिहून दिलेल्या मोबाईल नंबर संपर्क साधला असता ट्रूकॉलरवर संदीप बोराडे असे नाव आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अवघ्या काही तासातच जेरबंद केले. संदिप रावसाहेब बोराडे वय 29 रा. रांजणगाव (शेणपुंजी) असे आरोपीचे नाव असून तो दूध विक्रीचा व्यवसाय करतो.