वाळूजमहानगर, (ता.3) :- कपंनीच्या सुरक्षा भिंती मधील मोकळ्या जागेमध्ये पडलेले 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे स्क्रँप मटेरिअल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही चोरीची घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के. सेक्टर -74 येथील सोना स्टील इंटरप्राईजेस येथे घडली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दिपक खापरे हा के स्केटर 74 गट नं. 30 प्लाँट नं.1 येथे सोना स्टील इंटरप्राईजस कपंनीत मॅनेजर म्हणुन काम करतो. 17 नोंव्हेबर रोजी दिपक सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कपंनीत काम करून घरी गेल्यानंतर 21 नोव्हेबरला कपंनीत कामासाठी आला. नेहमी प्रमाणे सुरक्षा भिंतीच्या मोकळ्या जागेवर पाहणी केली असता स्क्रँप मटेरिअर हे अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यावरून चोरी झाल्याची खात्री झाल्याने मालाची तपासणी केली. त्यात 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 40 किलो वजनाचे 150 गोण्या तसेच 1 लाख रुपये किमतीचे एमएस, एच आर पंचिन बॉक्स असा 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे ऐवज चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे़.
