February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.14) – ड्युटी करून घरी परत येत असलेल्या 47 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अंधाराचा फायदा घेत रस्त्यात अडवून त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा जवळजवळ 40 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला. ही घटना गोलवाडी शिवारातील सिडको चौफुलीजवळ गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोलवाडी येथील धोंडीराम सुंदरलाल (वय 47) सलामपुरे हे सुरक्षारक्षक गादिया ग्रुप गट नं.56 गोलवाडी शिवारात शिवरुद्रा सिक्युरिटीमध्ये काम करतात. गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी ड्युटी करून सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सलामपुरे हे ज्युपिटर मोपेड (एम एच 20, एफ झेड -3662) वरून ए एस क्लब चौफुलीकडून धुळे सोलापुर रोडने घरी जात असताना, सिडको चौफुली येथे रात्री 7:15 वाजेच्या सुमारास समोरून एका दुचाकीवर 2 अनोखी इसमा आले. आणि काहीतरी धारदार वस्तूचा धाक दाखवून खिशातील रोख 2200, रेडमी कंपनीचा 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल व 30 हजार रुपये किमतीची मोपेड (एम एच 20, एफ झेड -3662) असा 39 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज बळजबरी स्काऊल पळून गेले. याप्रकरणी धोंडीराम सलामपूरे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *