वाळूजमहानगर, ता.26 – वाळूज औद्योगिक परिसरातील सुधा इंडस्ट्रीजचे मालक तथा उद्योगपती सुधाकर जवळकर, युवा उद्योजक सुशांत जवळकर यांना महाराष्ट्र राज्य उद्योगरत्न पुरस्कार नाशिक याठिकाणी सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित, ऑनर्स कंपनी खडकीचे संचालक यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.24) रोजी देऊन गौरविण्यात आले.
उद्योगपती सुधाकर जवळकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिरूर घाट या गावातील असून हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणाच्या निमित्ताने आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्योगपती सुधाकर जवळकर यांनी आपल्या आयुष्याचा खरतड प्रवास करीत आज घडीला वाळूज औद्योगिक परिसरात उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्योगपती सुधाकर जवळकर हे उद्योगपती असतानाही डॉ.जी.एस. कुलकर्णी प्रतिष्ठान, संत ब्रम्हाण सेवाभावी संस्था, औरंगाबाद अर्बन बँक आदी क्षेत्रात कार्यरत आहेत.
या पुरस्काराबद्दल अध्यक्ष विलास कस्तुरे, सचिव मधुसूदन पांडे, सरस्वती विद्यामंदिरचे अध्यक्ष केशव कानीटकर, डॉ.संजय काळे, मनोज कानीटकर, राहुल जवळकर, सचिन जवळकर, बँकेचे संचालक सुरेश वाघचौरे पाटील, घानेगांवचे सरपंच केशव गायके, सामाजिक कार्यकर्ते विजय शुक्ला, सुधाकर गायके, संतोष गायकवाड, पोलिस पाटील शाम फाळके आदींनी स्वागत केले.