
वाळूजमहानगर, (ता.1)- बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कुल मध्ये राष्ट्रीय हस्ताक्षर दिन व स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात झाला.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 15 शाळेमधील 1 हजार 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमधून 1 ली ते 4 थी (अ गट) मधून प्रथम आयुष महाले, व्दितीय नम्रता रुमाले, तृतीय सायली मेंगडे, 5 ते 7 ( ब गट) मधून प्रथम श्रेयस गिराम, द्वितीय आकाश तांदळे व तृतीय मनस्वी बोरसे तर (गट क) मधुन प्रथम मयुरी जिलेवाड, द्वितीय कार्तिक आलेवार व तृतीय अनुष्का लाहुडकर यांनी पारितोषिके जिंकली. 
स्पर्धेनंतर लगेच प्रा. नंदकिशोर धोंडीराम मापारी संपादित “सुंदर हस्ताक्षर” या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. राहुल कुसुंबी यांच्या हस्ते झाले. खराब हस्ताक्षर ही विद्यार्थ्यांची मोठी समस्या आहे. हस्ताक्षराविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हते. ते आता उपलब्ध झाल्याने याविषयी मार्गदर्शन लेखक नंदकिशोर मापारे यांनी केले. 
तसेच सुंदर हस्ताक्षर पुस्तकाच्या माध्यमातुन एक पालक म्हणुन, एक शिक्षक म्हणुन व एक विद्यार्थी म्हणुन काय प्रयत्न करावे, याचे सखोल ज्ञान या पुस्तकात आहे. असे हनुमान भोंडवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक हनुमान भोंडवे हे होते. तर प्रमुख पाहुणे वडगाव (को.) चे सरपंच सुनील काळे, बालकवी गणेश घुले, गायक श्रीराम पोतदार, इपका लेबोरेटरीचे एच आर प्रमुख व्यंकट महिलापुरे, दिलीप मडके, केशव कानिटकर, वैभव पवार, प्रा. नारायण सोनवणे, अरुण मडके, मोहनीराज वैद्य, काकाजी जीवरक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पोद्दार तर आभार श्रीकृष्णा मापारे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनोहर साळुंके, विजय कुबेर, शाम गिराम, सचिन पायघन, अमोल मुंगीकर, राहुल ढाकरके व कला शिक्षकांनी परिश्रम घेतले.
