वाळूजमहानगर, (ता.14) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलचे विद्यार्थी 10 वी सीबीएससी बोर्ड परीक्षा -2023-2024 मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याने 100 टक्के निकाल आला.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ऑर्किड टेक्नो स्कूलचे 96 विद्यार्थी बसले होते. यात 25 विद्यार्थ्यांनी 90 ते 80 टक्के गुण मिळवले. त्यात प्रांजल नेरकर हिने सामाजिक शास्त्रात 99/100 गुणांसह 97.2 टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक मिळवला. रुचिता धाकरे 96.4 टक्के गुणांसह इंग्रजी आणि संस्कृतमध्ये 99 / 100 गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे. पूर्वल मंगेश आदिक ही
सामाजिक शास्त्रात 98/100, आणि संस्कृतमध्ये 99/ 100 गुणांसह 95.8 टक्के गुणांसह तिसरा क्रमांकावर राहिली. ओम अरुण गायकवाड 95.4 टक्के गुण मिळवून चौथा, प्रियांशू मृत्युंजय सिंह सामाजिक शास्त्रात 95 टक्के 99 / 100 गुण मिळवून गुणवत्तेत 5 वा, पूरब प्रकाश चौधरी 94.6 टक्के गुण मिळवून गुणतालिकेत 6 वा क्रमांक पटकावला आहे. लिखित बालकृष्ण देशमुख 94.6 टक्के गुण मिळवत संस्कृतमध्ये 100/100 गुण मिळवत 6 वा क्रमांक. अनिष्का संजय उरकुडे 94 टक्के, गौरव बदरीनारायण
कोंडके 93.2 टक्के आणि नरेंद्र योगेश सराफ 93 टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व शिक्षक तसेच पालक यांनी स्वागत केले.