वाळूजमहानगर, ता.2 – सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत बजाजनगर येथील वेल्डन कॉमर्स क्लासेसचा दणदणीत निकाल लागला. यात सूरज नर्सिंग काकडे याने वाळूज महानगर मधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला.
भारतात सर्वात कठीण असणारी सीए फाउंडेशन परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये सी ए आय इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात वेल्डन कॉमर्स क्लासेसचा परंपरेनुसार याही परीक्षेत दणदणीत निकाल लागला. क्लासेस मधून वाळुज महानगरातून सर्वप्रथम सूरज नर्सिंग काकडे आला. त्याने 400 पैकी 243 गुण घेतले, त्याचबरोबर
शृष्ठीना राठोड 400 पैकी 215, तर नम्रता गवळी हिने 210 गुण घेतले. सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश संपादन करणाऱ्या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे वेलडन क्लासेसचे संचालक प्रा. सचिन घुगे, सीए केदार पांडे, प्रा.चंद्रकांत जाधव, प्रा.अर्जुन हरिश्चंद्रे, प्रा. गोविंद देशमुख, प्रा.विकास निकम, प्रा.श्याम जाधव, प्रा.ज्योती शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक केले.