
वाळूजमहानगर, (ता.23) – सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत देखभाल दुरुस्तीसह विकास कामास प्राधान्य देऊन वाळूज महानगरचा विकास करून आपले वाळूज महानगर सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेलाच हस्तांतरीत करावे. या प्रमुख मागणीसाठी वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या बैठकीचे आयोजन रविवारी (ता.24) रोजी करण्यात आले आहे.
सिडको वाळूज महानगरचे हस्तांतरण करण्याचा घाट शासन स्तरावर सुरू आहे. सिडकोने या परिसरात वाळूज महानगर -1,2 व 4ची निर्मिती केली. त्यापूर्वी सिडकोने आश्वासित केल्याप्रमाणे येथे अनेक नागरी समस्या सोडवल्या नाहीत. विशेष म्हणजे सिडको वाळुजमहानगर प्रकल्प अंतर्गत देखभाल दुरूस्तीसह विकास कामे मागील 3 वर्षांपासून उच्च न्यायालयात शपथपत्र देऊनसुध्दा सिडको करत नाही. विकास अराखड्यातील सेवा, सविधा, भुखंड अरक्षित न करता या पुढे कुठलीही जागा अधिग्रहण करणार नाही. असे जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. एकीकडे हस्तांतरणाचा घाट व दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र. या बाबत चर्चा करून हस्तांतरणास विरोध करण्यासाठी सिडको वाळुजमहानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून रविवारी (ता.24) रोजी बैठक घेऊन पुढील भुमिका ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे सिडको वाळूजमहानगर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागरिक, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे अवाहन सिडको वाळुजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी केले आहे.
