वाळूज महानगर, (ता.11) – कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून वॉल कंपाऊंडच्या गेटला तसेच बोलोरो जीपला जोराची धडक दिली. हा हिट अँड रन चा अपघात शनिवारी 9 जानेवारी रोजी एक वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कार (एम एच 12, टी के – 0430) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगाई व निष्काळजीपणे चालवुन सुखदेव गुपचंद प्रधान रा. प्लॉट नं 450 सिडको वाळुज महानगर 1 यांच्या लोखंडी कंपाऊंडला तसेच विनोद जगन्नाथ चोपडे वय 48 वर्षे रा. सिडको वाळुज महानगर 1 यांच्या बोलेरो ( एम एच 20, एफ जी -1144) ला धडक दिली. शनिवारी 9 जानेवारी रोजी 1 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात प्रधान यांच्या गेटचे व चोपडे यांच्या बोलेरो गाडीचे नुसकान झाले. याप्रकरणी सुखदेव गुपचंद प्रधान यांच्या फिर्यादीवरून आरोपी कार चालका विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
