March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.9) – सिडको वाळूजमहानगर -1 मधील सिध्दिविनायक विहार येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून विविध कार्यक्रमाने जागतिक महिला दिन बुधवारी (ता.8) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


आठ मार्च हा जागतिक महिला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच जागतिक महिला दिनानिमित्त वाळुज परिसरातील सिडको वाळूज महानगर एक येथील श्री सिध्दिविनायक विहार रो-हाऊस ओनर्स को-ऑप हौसिंग सोसायटी मर्या च्या वतीने सिध्दिविनायक विहार सिडको वाळूजमहानगर -1 येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक व ईतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रांगोळी स्पर्धा व ईतर स्पर्धेचे आयोजन करून महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकीतून भविष्यात झाडे लावा झाडे जगवा हे आभियान राबविण्यासाठी संकल्प करण्यात आला. यावेळी शारदा सानप, सिता राठोड, दैवशाला कुठारे, मिता करे, निकीता वाजगे, ज्योती राऊत यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महिला दिनानिमित्त दीप्ती वाघमारे, अनुजा राडकर, सुनंदा भोसले, संध्या कुठारे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घसे यांनी तर आभार शारदा सानप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली जाधव, मुंढे मुक्ता, मयुरी खेडकर, सविता शेलगांवकर, सुनिता करंडे, सुनिता शिंगडे, सुरेखा लटपटे, सुजाता शिंदे, चौधरी मनिषा, अंजनी पाटील, चंद्रकला उकिर्डे, चंद्रकला ताठे आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *