वाळूजमहानगर, ता.7 – घराला कुलूप लावून मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या घराचे व लोखंडी लॉकरचे कुलूप तोडून आतील जवळजवळ सव्वा दोन लाख रुपये किमतीचे 59 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. भरदिवसा झालेली ही घर थोडी मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान सिडको वाळूज महानगर -1 येथे झाली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बसंता काशी आकार हाईटस अपार्मेंट सुर्यवंशी नगर सिडको महानगर-1 येथील पल्लवी गणेश चोपडे (वय 35) ही महिला मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजे पर्यंत मुलीला शाळेत सोडण्याठी राहते घराचे दरवाज्यास कुलुप लावुन गेली होती. घर बंद असल्याची संधी साधून कोणीतरी अज्ञात इसमाने पल्लवी चोपडे यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलुप व लोखंडी कपाटातील लॉकर तोडुन त्यातील 1 लाख 32 हजार 40 रुपये किमत असलेला 4 ताळे 520 ग्रॅमचा एक सोन्याचा राणी हार, 36 हजार 575 रुपये किमतीची 5 ग्रॅम 820 मिली एक सोन्याची चैन, 17 हजार 640 रुपयाची 5 ग्रॅम वजनाची एक सोन्याच्या अंगठी, 14 हजार 530 रुपये किमतीची 4 ग्रॅम 390 मिली वचनाची एक सोन्याच्या अंगठी, 16 हजार 885 रुपये किमतीचे 3 ग्रॅम 30 मिली वजनाचे सोन्याचे कानातील एक जोड. असा एकुण 2 लाख 17 हजार 670 रुपये किमंतीचे 59 ग्रॅम 3 मिली सोन्याचे दागिने. याशिवाय बँक आँफ बडोदाचे पासबुक, होडा अँक्टीव्हा स्कुटी (एम एच 12, एस पी -9367) व बजाज प्लॅटीना दुचाकी (एम एच 20, बी एच -8137) या दोन्ही वाहनाचे आर सी बुक, तसेच गणेश चोपडे यांचे पॅन कार्ड, मतदान कार्ड चोरून नेले. याप्रकरणी पल्लवी गणेश चोपडे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.