वाळूजमहानगर, ता.26- हँडल लॉक करून हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अर्ध्या तासातच अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना 19 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगर -1 येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिसगाव येथील समिर युनुस शेख (वय 22) हा 19 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20, जीपी -4902) वर नाष्टा करण्यासाठी सिडको वाळूज महानगर -1 येथील सिडको गार्डन समोरील हॉटेलमध्ये गेला. तेथे दुचाकी हँडल लाँक करून ऊभी केली. व नाष्टा करुन अर्ध्या तासात दुचाकी लावलेल्या ठिकाणी येईपर्यंत अज्ञात आरोपीनी 50 हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली होती. या दुचाकीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.