February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.29 – सिडको वाळूजमहानगर सबस्टेशन अंतर्गत दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्याबाबत तसेच सब स्टेशनचे विभाजन करण्यासाठी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समिती व वीज ग्राहक यांच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सिडको वाळूजमहानगर सबस्टेशन अंतर्गत जवळपास 25 ते 30 हजार ग्राहक असुन सिडको वाळूजमहानगर सबस्टेशनवर अतिरिक्त भार कमी करण्यासाठी सिडको वाळूजमहानगर-2 तसेच एएस क्लब, म्हाडा काॅलनी, सिध्दिविनायक विहार, स्नेहवाटिका, मालपाणी बात्रा, स्वप्नपुर्ती, राजस्वप्नपुर्ती, राजस्वप्नपुर्ती ईलाईट, भारत नगर, आदर्श काॅलनी व ईतर परिसरातील भार पाटोदा येथून टाकण्यात आला. पाटोदा सबस्टेशनवरून
विद्युत पुरवठा सम्यक गार्डन तसेच साऊथसिटी फिडर जोडण्यात आला. या फिडरवर येणारी लाईन ही जास्तीतजास्त शेतातून आसल्यामुळे सतत बिघाड होत असते. लाईन दुरूस्ती करायला किंवा ते शोधण्यासाठी लाईनमनला तारेवरची कसरत करावी लागत असुन दुरूस्तीसाठी तासंतास तर लागतोच. परंतु या दरम्यान फ्रॅक्च्युवेशनच्या प्रमाणात वाढ सुध्दा झाली आहे. मागील एक वर्षात सिडको वाळूजमहानगर, तिसगाव परिसरातील ग्राहक यांचे विद्युत उपकरणे बर्‍याच वेळेस जळाले असुन यात आता सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे या सबस्टेशनची विभागणी करणे अत्यंत गरज आहे. तसेच जोपर्यंत विभाजन होत नाही. तो पर्यंत या सबस्टेशनची कार्यक्षमता 5 एमव्हीए वरून 10 एमव्हीए करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिडको वाळूजमहानगर सबस्टेशनची क्षमता तातडीने वाढवून तसेच सबस्टेशन विभाजन करून ही समस्या तातडीने सोडवावी. या मागणीसाठी वाळूजमहानगर बचाव कृती समिती व वीज ग्राहकच्या वतीने कार्यकारी अभियंताची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य नागेश कुठारे यांनी दिली.
विभाजनाची मागणी दोन वर्षापासून –
सिडको वाळूजमहानगर सबस्टेशन हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात जास्त ग्राहक असणारे मोठे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन अंतर्गत ग्राहक संख्येच्या तुलनेत अपुरे कर्मचारी आहेत. त्यात विज बिलाच्या वसुलीचा अधिकचा भार असल्यामुळे लाईनमनला देखभाल दुरूस्ती व ईतर असुरक्षित बाबींवर कामे करण्यास वेळ मिळत नाही. यामुळेच या सबस्टेशनच्या विभाजनाची मागणी सुमारे दोन वर्षांपूर्वी तात्कालिन सहव्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली होती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *