February 5, 2026


वाळूजमहानगर ता.05) -सिडको वाळूजमहानगर येथील विविध नागरी वसाहतीत सध्या डेंगुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय विविध नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तात्काळ धूर फवारणी करून समस्यांचे निराकरण करावे. अशी मागणी नागेश कुठारे यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्यप्रशासक भुजंग गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे गुरुवारी (ता.2) रोजी केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, सिडको वाळूज महानगर प्रकल्पांतर्गत औषध व धुर फवारणी ही महिन्यात दोन वेळा होणे अपेक्षित आहे. मात्र ती वेळेत होत नाहीत. संबंधित कंत्राटदार, सुपरवायझर या ठिकाणी रहात नाही. त्यामुळे फवारणी करणारे कर्मचारी हे व्यवस्थित फवारणी न करता आपला वेळ सह्या घेण्यात घालत असतो. सिडको प्रशासनास सेवा कर आकारणी करते. जर सेवा कर भरण्यास विलंब झाल्यास त्यावर 18 टक्के विलंब आकार आकारण्यात येतो. मात्र सेवा देण्यास सिडको कमी पडत आहे.

या बाबींवर वैयक्तिक लक्ष देऊन दैनंदिन फवारणी करण्याबाबत संबंधित आधिकारी तसेच कंत्राटदार यांना सुचना द्याव्यात तसेच मुख्य रस्त्यावरील पॅच वर्क डांबरीकरण लवकर पुर्ण करणे, मध्यम व लघुउत्त्पन्न गटाच्या वसाहतीतील नाल्यावरील भिंत दुरूस्ती करणे, धुळे-सोलापर राष्ट्रीय महामार्गावरून नगर-2 चा मुख्य रस्ता जोडणी करणे, मुख्य रस्त्यावरील झाडाझुडपांची कटिंग करणे, धुळे-सोलापर महामार्गलगत ड्रेनेजलाईन उभारणी करणे. ही कामे तातडिने करावे. या मागणीसाठी निवेदन दिले. निवेदनावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा देणारे उपसरपंच नागेश कुठारे, शितल गंगवाल, भगवान खेडकर, विजय शेळके आदींची नावे व सह्या आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *