February 5, 2026

बेपत्ता झालेला इसम

वाळूजमहानगर – सिटीत जाऊन येतो. असे पत्नीला सांगून पाच दिवसापासून गेलेला 45 वर्सीय इसम घरी परत न आल्याने तो हरवल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंदनगर, सिडको वाळुज महानगर येथील किशोर प्रल्हाद गवई (वय 45) हे (ता.24) रोजी दुपारी 4.30 वाजता पत्नी अर्चनाला म्हणाले कि, मी सिटी औरंगाबाद येथे जावुन येतो. असे म्हणुन गेले. परंतु ते आत्तापावेतो घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा आजुबाजुच्या परिसरात व नातेवाईकाकडे, आत्तापावेतो शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. रंग- सावळा, शरीरबाधा-मजबुत, नाक सरळ, केस काळे उंची -5.6 फुट, चेहरा-गोल, अंगात-पांढरा रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट, मराठी, हिंदी भाषा बोलता येते. असे त्यांचे वर्णन आहे. या प्रकरणी अर्चना किशोर गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार आर. एस. उदे करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *