
वाळूजमहानगर, (ता.5) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 अंतर्गत 5 वर्ष खालील बालकांना पोलिओ लसीकरण मोहीम सिडको वाळूजमहानगर तिसगाव परिसरामध्ये राबवण्यात आली.
या मोहिमेसाठी जवळपास 20 ठिकाणी पोलिओ बुथचे नियोजन करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ.कें.दौलताबाद अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. सिडको वाळूजमहानगर येथे तिसगावचे माजी उपसरपंच नागेश कुठारे यांच्या उपस्थितीत बालकांना डोस पाजुन पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी डाॅ.परमेश्वर वाकदकर, डाॅ.जितेंद्र मंडावरे,आरोग्य सहाय्यक राधेश्याम वैष्णव, आरोग्य सेवक सुशांत बिडकर, वर्षा हनुमंते, प्रतिक्षा हनुमंते, कल्पेश शिरसाट, योगेश थोरे उपस्थित होते. परिसरातील 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात महिला पालकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लाभ घेतला.
