March 25, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – सिडको वाळूज महानगर -1 येथील तिरुपती नगर हाउसिंग सोसायटी, गट क्रमांक 170 मध्ये ओम नर्मदेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होऊन मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी (ता. 3) रोजी करण्यात आली.


सुमारे सात हजार स्क्वेअर फूट जागेत या मंदिरात कळसासह पिंड व नंदीची स्थापना करण्यात आली असून, उर्वरित जागेत नारळ, चिंच, बदाम, लिंब यांसारख्या जवळजवळ 60 झाडाची लागवड करण्यात आली आहे. या वृक्ष लागवड उपक्रमामुळे परिसरातील झाडे 20 ते 25 फूट उंच वाढलेली असून, मंदिराचा परिसर अतिशय सुशोभित आणि पर्यावरणपूरक झाला आहे. या मंदिराच्या उभारणीत तसेच परिसराच्या सौंदर्यवृद्धीत सोसायटीमधील आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने योगदान दिले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *