March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – सिडको वाळूज महानगर 1 व 2येथील मूलभूत समस्या सोडवण्यात याव्यात. याबाबत सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीने 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सिडको कार्यालय (नविन शहरे) उद्योग भवन औरंगाबाद येथे प्रशासक सोहम वायाळ यांच्या सोबत नुकतीच बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत कार्यकारी आभियंता कपिल राजपुत, भुमापक माधव सुर्यवंशी, वसाहत आधिकारी अस्मिता विरशीत, महेश करामपुरे, सहाय्यक अभियंता उदय चौधरी उपस्थित होते. यावेळी कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये सिडको वाळुजमहानगर 1 व 2 चा विकास करण्यास गेल्या 3 दशकापासून सुरूवात करूनही अद्याप मुलभूत सुविधापासून या दोन्ही नगरातील नागरिक वंचित आहे. नियमित सुविधा द्या तसेच रखडली उर्वरित विकास कामे त्वरित करावे. ही प्रमुख मागणी तिसगावचे उपसरपंच तथा सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत असलेल्या शिष्टमंडळाने केली. अपुर्ण रस्ते, सर्विस रोड, पथदिवे, क्रिडांगण, पाणी पुरवठा, ऑनलाईन पाणी बिल व ईतर देय्यक स्वीकारणे, कचरा संकलन, धुर फवारणी या विषयावर चर्चा करून हे काम नियमित पणे करावे तसेच उर्वरित पथदिवे उभारणी करणे, कचरा संकलन तसेच फवारणी साठी जास्तीत जास्त संख्येच्या तुलनेत कर्मचारी नियुक्त करून निवेदा काढणे तसेच मलनिस्सारण प्रकल्प, नविन पाण्याची टाकी उभारणी, देवगिरी नदीवरील पुलांची उभारणी करणे, रस्ते दुरूस्ती तात्काळ करणे, क्रिडांगणाची दुरूस्ती करून भाडेतत्त्वावर देणे, गोलवाडी टेकडीचा विकास करणे, सर्विस रोडची उभारणी करणे. या मागणी केली असता त्या सर्व मागण्या तातडीची समजून करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे-उपसरपंच तिसगाव उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, पी एस गुजर, बाबासाहेब गावंडे, अंकुश लेंडाळे, विरभद्र वनशेट्टी, अमर राजपुत आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *