वाळूजमहानगर, ता 12 – सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत मुख्य रस्यावर दुभाजक टाकणे, पाणी साचत असलेल्या ठिकाणी पावसाचे ड्रेन लाईन टाकुन मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी समस्या सोडवण्याबाबत सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनास निवेदन देण्यात आले.
सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी उदय राजपुत यांना गुरुवारी (ता.12) रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत मुख्य रस्त्याची उभारणी करून बरिच दिवस झाले. त्यामुळे परवानगी घेऊन तसेच विना परवानगी मुख्य रस्ता विविध कारणासाठी खोदल्यामुळे रस्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले. या बाबत सिडको प्रशासनास निवेदन देऊन तसेच मुख्य रस्त्याचे रिसर्फेसिंग, सुर्यवंशीनगर, सिध्दिविनायक विहार, ए एस क्लब समोर, नायरा पेट्रोल पंप, सिडको ग्रोथसेंटर मधील काही भाग व ईतर परिसरात जागोजागी पाणी साचते. तसेच मनाली गार्डन, तिसगाव रोड तसेच द्वारकानगरी रोडवर दुभाजक उभारण्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या. ते कामे मंजुर झाले. मात्र ती कामे आद्यापपर्यंत सुरू झाले नाहीत. मंजुर कामे तातडीने सुरू करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने सिडको प्रशासनाच्या विरोधात जनअंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी शिष्टमंडळात सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, शितल गंगवाल, सतीश शिंगडे, विनोद साठे, सहसचिव चंद्रकांत पाटील, आर आर पाटील, दिपक कुळधर, शशिकांत होळ, राजेंद्र मोतेकर, शशिकांत नारखेडे यांचा समावेश होता.