वाळूजमहानगर, (ता.12) – अत्यंत दुरावस्था झाल्याने सिडकोतील रस्त्याची कामे करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर सिडकोच्या वतीने काम हाती घेण्यात आले. मात्र दर्जेदार काम करण्याऐवजी केवळ डांबरीकरणाची मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र मलम पट्टी करण्याऐवजी येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्याचे काम दर्जेदार करा अशी मागणी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने होत आहे. 
सिडको वाळुजमहानगर-1 परिसरातील सिडकोच्या अंतर्गत व मुख्य रस्तावर पडलेले मोठमोठे जीवघेणे खड्यामुळे अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत होती. याबाबत रहिवाशांकडून सततच्या तक्रारी पाहुन सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतिने अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, काकासाहेब बुट्टे, सुदाम जाधव, गणेश बिरंगळ, प्रविण हडे, सुरेश कनसे, शितल गंगवाल, गजानन गार्डे, मच्छिंद्र कुंभार, तेजस बढे, काकासाहेब गाढे, अंबादास गुंजाळ, अंकुश लेंडाळे, पंडित शिंदे, कल्पेश शिरसाट, भुपेंद्र परिहार आदींनी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावा अंती सोमवारी (ता.11) पासून रस्त्यावरिल पॅच वर्क चे कामास सिडकोकडून सुरूवात करण्यात आली. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी लावण्यात येत आहे. सिडको प्रकल्पांतर्गत संपुर्ण रस्ते नव्याने दर्जेदार (पुनरुत्थान) करावे. अशी मागणी करण्यात आली असून यासाठी उच्च न्यायालयात तसेच लवकरच रस्त्यावरिल लढाई लढणार असल्याचे सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष नागेश कुठारे यांनी सांगितले आहे.
—- (प्रतिक्रिया ——–
– मच्छिंद्रनाथ कुंभारे,
सचिव, सिडको वाळूज महानगर बचाव कृती समिती-
रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून आम्ही संपूर्ण रस्त्याचे सरसकट डांबरीकरण अशी मागणी मागणी केली होती. मात्र तसे न करता, सिडको फक्त खड्डे बुजवत आहे. हे तात्पुरते काम आहे. यामुळे पुन्हा रस्त्याचा तोच प्रश्न निर्माण होणार आहे.
—- (प्रतिक्रिया ——–
लघुउद्योजक, अंबादास गुंजाळ –
सिडको वाळूज महानगर हा मोठा परिसर आहे, येथे नागरी सुविधा पुरविण्याचे काम सिडको करते. मात्र त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र मजबुतीचे काम न करता केवळ डाग डुजी करण्यात येत आहे.
