March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – सिडको वाळूज महानगरच्या मालमत्ता अधिकारी अस्मिता वीरशीद यांच्या मनमानी कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, शहर प्रमुख सागर शिंदे, उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी सिडकोच्या मुख्य प्रशासकांना शुक्रवारी (ता.28) रोजी दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, अस्मिता वीरशीद या वाळूज कार्यालयात रुजू झाल्यानंतर काही दिवसातच अधिकाराचा गैरवापर करत सातत्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यवसायिकांना त्रास देत आहेत. पदाचा धाक दाखवत त्यांनी दहशत निर्माण केली आहे. कारवाईच्या नावाखाली भेदभाव होत आहेत. एकीकडे मोठे बांधकाम व्यवसायिक यांच्यावर इतर क्षेत्रातील अतिक्रमणाकडे सतत कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहेत. उलट छोटे व्यापारी व्यावसायिक औद्योगिक क्षेत्रात मोलमजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांना कारवाईच्या नावाखाली सातत्याने त्रास देण्याचे काम त्या करीत आहे. 27 एप्रिल रोजी एलआयसी योजनेलगत वडगाव – तिसगाव या मुख्य रस्त्यावरील एका इमारतीत अतिरिक्त बांधकाम काढण्याच्या उद्देशाने अचानक येथे येथील माऊली ऑटोमोबाईल्स, गॅरेज व्यावसायिक यांना सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून स्वतः अरेरावी करत धमकवण्यास सुरुवात केली. त्या व्यवसायिकांनी विनंती करून सुद्धा त्यांचे ऐकून घेतले नाही. एका गरीब शेतकऱ्याचे दुकान जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे अनाधिकृत बांधकामाबाबद आम्ही अनेक तक्रारी देऊनही त्यांच्यावर कारवाई केली नाही. जे पैसे देत नाही, त्यांच्यावर सिडको प्रशासन कारवाई करते. असे निदर्शनास येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयीन कामाच्या संदर्भात फाईल्स कित्येक महिने प्रलंबित ठेवण्यात येतात. अशा बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचे पुरावे ही अनेक वेळा दिले. आणि यापुढेही सादर करण्यात येईल. असेही निवेदनात म्हटले आहेत. मालमत्ता अधिकारी अस्मिता विरशीद यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विष्णू जाधव, सागर शिंदे व दत्तात्रय वर्पे यांनी दिला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *