वाळूजमहानगर, (ता.7) – वाळूज येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना ए एस क्लब सिग्नलवर थांबलेल्या एका डॉक्टरचे लक्ष विचलित करून त्यांच्या कारमधुन मोबाईल लंपास केला. दुसऱ्या घटनेत मोहटादेवी चौकातील भाजीपाला विक्रेत्याचा मोबाईल हातगाडीवरून लंपास केला. या दोन्ही घटना गुरूवारी ता सहा रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. चेतन बिलवाल हे दंत तज्ञ असून त्यांचे रुग्णालय वाळूज येथे आह. ग़ुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ते कार मधून संभाजीनगर कडे जात होते. दरम्यान ए एस क्लबजवळ सिग्नल लागल्याने ते थांबले. त्याचवेळी एक जन अचानक समोरून आला आणि पायाला मार लागल्याचा बनाव केला. यावेळी त्यांनी काच खाली करून त्यास बोलत असताना पाठीमागून एकाने दरवाजा ठोठावला. बीलवाल यांनी त्यास काय झालं ? असं विचारले तोच समोरील चोरट्याने त्यांच्या गाडीतील समोर ठेवलेला विवो कंपनीचा मोबाईल गाडीत हात घालून काढून घेतला. ब्लूटूथवर चालू असलेले गाणे अचानक बंद झाल्याने बिलवाल यांना लगेच हा प्रकार लक्षात आला. मात्र इतक्यात सिग्नल सुटल्याने गाडी बाजूला घेत असतानाच संधी साधत मोबाईल चोरटे तिथून पसार झाले. दरम्यान दुसऱ्या घटनेत बजजानगरातील मोहटादेवी चौकात शिवाजी पवार हे हात गाडीवर भाजीपाला विकतात. गुरूवारी सायकांळी 6 वाजेच्या सुमारास पवार त्यांची पत्नी ग्राहकांना भाजीपाला देत असतांना अज्ञात महिलीने हातचलाखीने मोबाईल उचलुन पोबारा केला.