March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.19) – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त वाळूज महानगरातील तिसगाव येथे शनिवार 19 जुलै रोजी निःशुल्क आरोग्य तपासणी व आरोग्य जन जागृती शिबिर घेण्यात आले.

तिसगाव येथील ग्रा.पं. कार्यालयासमोरील सभागृहात हा सेवाभावी उपक्रम सेवा भारती, आरोग्य भारती द्वारा आयोजित करण्यात आला. डॉ.हेडगेवार रुग्णालयाचे डॉ.आप्पा कुलकर्णी, डॉ दीपक नाकुडे, डॉ ईशा अहिरराव, डॉ प्राजक्ता खाडे, डॉ राजेंद्र राक्षे, डॉ विशाल धुने यांनी ग्रामस्थांची निःशुल्क रक्त, लघवी, ईसीजी, व डोळे तपासणी करून औषधी गोळ्या वितरीत केल्या. शिबिराचा शुभारंभ तिसगावच्या सरपंच शकुंतला कसुरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिर यशस्वीतेसाठी अनंत ठाकरे, भानुदास कुलकर्णी, तात्या कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *