March 22, 2026

वाळूज महानगर, (ता.12) – वाळूज परिसरातील साजापूर येथे एका भंगारच्या गोडाऊन अचानक आग लागून अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित टळली. ही घटना रविवारी 11 जानेवारी रोजी सकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साजापुर येथील गट नं 54 मधील भुखंड क्र 110 येथे भंगार व्यावसायिकांचे गोडावून आहे. या गोडाऊनमधील भंगार साहित्याला अचानक आग लागली. या आगीच्या घटनेत प्लास्टिक साहित्य, पाईप, पत्रे व लाकडी फळ्या आदी विविध साहित्य जळून खाक झाले. तसेच बाजूला उभा असलेले लोडींग वाहन (एमएच-45, टी -0566) ला आग लागली. दरम्यान या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले चारचाकी वाहन अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या परिश्रमाने वाचवण्यात यश आले. मात्र भंगार साहित्य जळून अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जिवंतहानी झाली नसल्याचे समजते.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नसल्याचे वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
यांनी केले शर्तीचे प्रयत्न –
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाळूज अग्निशमन दलाचे अनिल देशमुख, एल जी ब्राह्मणकर, सुनील पाटील, आर जे जाट, ही एस पाटील, पी एस खाडे, पी आर नागरगोजे, एस एम महाले, एस एम कांडे आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *