March 24, 2026


वाळुज महानगर (ता.25) – मुंबई येथे राहणारी 32 वर्षीय महिला साजापूर येथील वडिलांच्या घरून शनिवारी (ता.18) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुलसेहरा तौफिक शाहा 32 वर्ष रा. पत्रेवाली चाळ, समरु बाग, भिवंडी, जि.ठाणा ही शनिवारी (ता.18) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास राहते घरातुन साजापुर येथुन निघुन गेली आहे. ती अद्यापावेतो घरी आली नाही. तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी मेहंदी हसन वय – 61 वर्ष रा. साजापुर यांच्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *