वाळूजमहानगर, (ता.22) – साजापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा मंगळवारी (ता.20) रोजी जाहीर झालेल्या निकालात माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम यांच्या एकता ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जनार्दन बनसोडे विजयी झाले. येथे एकता ग्राम विकास पॅनल ने 11 पैकी 6 जागेवर विजय मिळवून ग्रामपंचायतवर वर्चस्व प्रस्थापित केले.
साजापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम यांच्या नेतृत्वाखाली एकता ग्राम विकास पॅनल च्या माध्यमातून 11 उमेदवार उभे होते. त्यांच्या विरोधात उद्योजक जाफर पटेल यांचे जनता ग्रामविकास पॅनल उभे होते. या दोन्ही पॅनलमध्ये अत्यंत चुरशीचे निवडणूक झाली. मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात एकता ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जनार्दन बनसोडे यांनी 1 हजार 848 मते घेऊन विजयी झाले. तर सदस्य पदाच्या दहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एकता ग्राम विकास पॅनलचे शेख कैसर इस्माईल, आशाबाई गाडेकर, सय्यद कौसरबी कलीम, शेख मैमुनाबी हशम, शेख हबीब, मनीषा बनसोडे हे सहा उमेदवार विजयी झाले. तर जनता ग्राम विकास पॅनलने शेख मुख्तार चांद, किरण गंगावणे, जाफर पटेल, सत्यशीला बुरंगे विजयी झाले. तसेच यापूर्वी पॅनलच्या बानोबी आयुब पटेल बिनविरोध विजय झाल्या होत्या. त्यामुळे जनता ग्राम विकास पॅनलने पाच जागेवर विजय मिळवला. विजय मिळवल्यानंतर एकता ग्राम विकास पॅनलने गावात एकच जल्लोष करत फटाक्यांचे आतिषबाजी केली.
