वाळूजमहानगर (ता.15) : – साखर कारखान्याचा कर्मचारी नसताना कारखान्याचा कर्मचारी आहे. असे भासवुन साखर डिलेव्हरीसाठी बँक खात्यावर आरटिजिएसव्दारे 1 लाख 77 हजार 102 रुपये भरणा करण्यास भाग पाडले. व साखरेची डिलिव्हरी न देता फसवणूक केली. 16 मार्च 2022 रोजी घडलेली ही घटना सोमवारी (ता.14) रोजी उघडकीस आली.
वाळुज येथील शुभम ट्रेडर्सचे शुभम संतिशचंद साकला (वय 26) रा. गणेश चौक, वाळूज यांनी मुक्तेश्वर साखर कारखान्याच्या मॅनेजरचा स्वतःजवळ असलेल्या नंबरवर फोन करुन साखर पाहीजे असल्याचे सांगीतले. व डिलेव्हरी घेण्यासाठी दुसऱ्या असलेल्या नंबर 9284363723 वर कॉल केला असता त्यांनी सांगीतले की, आम्ही तुम्हाला कोणतेही खाते क्रमांक दिलेला नाही. तेव्हा समजले की, साखर मालाच्या डिलेव्हरीसाठी ज्या व्यक्तीसोबत शुभम साकलाचे फोनवर बोलणे झाले. तो मुक्तेश्वर साखर कारखान्याचा कर्मचारी नाही. त्याने साकला यांना मुक्तेश्वर साखर कारखान्याचा कर्मचारी आहे. असे भासवुन त्यांच्याकडुन साखर डिलेव्हरीसाठी बँक खाते क्र- 34933440382 स्टेट बैंक ऑफ इंडिया, शाखा बस स्टँण्ड जवळ बागलनगर, कुरुडवाडी, माढा सोलापुर आयएफएससी कोड नं. एसबीआयएन 0002158 यावर आरटिजिएसव्दारे खात्यावर 1 लाख 77 हजार 102 रुपये भरणा करण्यास भाग पाडले. याप्रकरणी शुभम सतिशचंद साकला रा. गणेश चौक, वाळूज यांच्या फिर्यादीवरून मोबाईल क्रमांक 7722097961 चा वापरकर्ता व स्टेट बँक ऑफ इंडिया, बैंक खाते क्र. 34933440382 चा खातेधारक आरोपीच्या विरोधात वाळुज पोलीस ठाण्यात कलम 419,420 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करीत आहे.