वाळूजमहानगर – वाळुज येथील शिवाजीनगर परिसरात असलेल्या साईकॉलनी येथे श्रीकृष्ण मंदिर परिसरात साईराजे दुर्गादेवी मित्र मंडळाच्या वतीने राज दांडियाचे आयोजन करण्यात आले असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात परिसरातील महिला दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या व मुली ड्रेस घालून देवीचा जागर करत आहे. यात देव देवतांच्या विविध धार्मिक कार्यक्रमासह राज दांडियाही रंगत आहेत. विविध गाण्यावर महिला दांडिया नृत्य करून कार्यक्रमात रंगत भरत आहे.