
वाळूजमहानगर, (ता.24) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश प.पु.गुरुमाऊली यांच्या आशिर्वादाने तसेच गुरुपूत्र आदरणीय नितिनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ बजाजनगर केंद्रा अंतर्गत 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सारा सार्थक तर सायंकाळी पाच वाजता साईश्रध्दा पार्क येथे बजाजनगर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सहकार्याने नवीन बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले.
प्रथम वर्गात स्वामींच्या प्रतिमेचे पूजन केले व गुरुपीठास अपेक्षित सेवाकार्याची प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. तसेच प्रतिनिधीना बालसंस्कार पाठ्यक्रम बजाजनगर सेवा केंद्रातर्फे भेट देण्यात आला. या वेळी बजाजनगर केंद्रातील प्रतिनिधींनी कार्यक्रमास उपस्थित राहुन सेवेकऱ्यांना बालसंस्कार विषयी मार्गदर्शन केले. तसेच केंद्रातील इतर सर्व विभाग विषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगुन त्यांचा व्यायाम ही घेण्यात आला. दर रविवारी सकाळी 9 ते 10.30 या वेळेत बालसंस्कार वर्ग होणार असून परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना या बालसंस्कार वर्गास पाठवून गुरुमाऊलींना अपेक्षित आदर्श पिढी घडविण्यास हातभार लावावा. असे आवाहन बजाजनगर केंद्राच्या वतीने करण्यात आले. या बालसंस्कार वर्गासाठी कोणतीही फी नसून विनामूल्य उपलब्ध असणार आहे.
—————–
