March 27, 2026


वाळूज महानगर, (ता.3)- आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूलमध्ये नववर्षाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संचालक प्रभाकर म्हस्के, अध्यक्षा निर्मला म्हस्के शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के व श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्री प्रायमरी ते 9 वी च्या जवळपास 200 विद्यार्थ्यांद्वारे शाळेच्या प्रांगणात मानवी साखळीच्या माध्यमातून तिरंगा व 2024 या प्रतिमा सादर करण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या अध्यक्ष निर्मला म्हस्के यांच्याकडून गतवर्षीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *