March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.2) – प्रसन्न शिक्षण संस्था संचालित आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त शनिवारी (ता.1) रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के होत्या.


प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका पूनम पाठक व मोनिका निर्मले यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेत आले. त्यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील सुबोध कोलते व भूमी भोजापुरे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती खंडागळे, जया पगारे, रुचिका मेहेत्रे, कविता भराडे, अभिषेक गौंड, देबारती घोष, प्रियंका गायकवाड, शिल्पा पोफळी, पुनम पाठक, रत्नप्रभा पाटील, मोनिका निर्मले, ज्योती साळवे, शितल महाले, सुप्रिया गणगे, आरती यादव यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *