March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.23) – प्रसन्न शिक्षण संस्था संचालित सह्याद्री स्कूल येथे “जल है तो कल है” अशा घोषणा देत जागतिक पाणी दिवस शुक्रवारी (ता.22) रोजी साजरा करण्यात आला.


याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रभाकर म्हस्के, अध्यक्षा निर्मला म्हस्के, शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के उपस्थिती होती. पाणी हा सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने पाटोदा येथील सह्याद्री स्कूल मध्ये जागतिक पाणी दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक प्रभाकर म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात पाण्याचे महत्व आणि त्याचा वापर कसा करावा. याबाबत समजून सांगण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवण्याचा संकल्प केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *