March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – पाटोदा येथील प्रसन्न शिक्षण संस्था संचालित सह्याद्री स्कूल येथे सीनीअर केजी च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के, श्रद्धा म्हस्के, किड्स केब्रिंजच्या मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक निलेश म्हस्के होते


यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी काळ्या रंगातील पदवी पोशाखात दिमाखदार प्रवेश केला. सिनियर केजी च्या चिमुकल्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना निर्मला म्हस्के श्रद्धा म्हस्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र, प्रगती पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया गणगे यांनी तर आभार आरती यादव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती यादव, ज्योत्स्ना पाटील, ज्योती साळवे, मोनिका निर्मळ, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, देबारती घोष, अभिषेक गौंड, कविता भराडे, आरती खंडागळे, रुचिका मेहेत्रे, कविता शर्मा, जया पगारे,परमेश्वर तवार, भाग्यश्री माचवे, माधवी कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *