वाळुज महानगर, (ता.16)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सी बी एस इ) दहावीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा यंदाही कायम राखली.
दहावी (सी बी एस इ) या परीक्षेत शांभवी कोटचिरकर (95.6), विश्वजीत मुळे (90), प्रेम पवार(89) हे विद्यार्थी गुणानुक्रमे व अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. सह्याद्री स्कूल मधून चांगले गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विनायक वायाळ (88.8), वैष्णवी आघाव (86.2), दर्शन भानुसे (86), संचिता राऊत (85.6), कार्तिक कांबळे (85.6) प्रथमेश डाके (85.4) प्रथमेश भवर (84.4), आरुष बनकर (82.8) या या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के, संचालक प्रभाकर म्हस्के यांनी स्वागत करून कौतुक केले. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.