
वाळूजमहानगर, (ता.16) – आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूलचे नवीन शैक्षणिक वर्ष 7 जून पासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त व नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. 
यावेळी मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच गुरुजीं द्वारे विद्यार्थ्यांना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे महत्त्व सांगून ते वदवून घेण्यात आले. वैदिक मंत्रोच्चारामुळे शाळेचे वातावरण पवित्र व सकारात्मक झाले. याप्रसंगी आरती यादव, सुप्रिया गणगे, शितल महाले, ज्योती साळवे, रत्नप्रभा पाटील, पुनम पाठक, आरती खंडागळे, शिल्पा पोफळी, अभिषेक गौंड, प्रियंका गायकवाड, देबारती घोष, रुचिका मेहेत्रे, जया पगारे, निलेश भालेराव यांच्यासह बालवर्ग ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक प्रभाकर म्हस्के, अध्यक्षा निर्मला म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त व नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला.
