
वाळुज महानगर, (ता.1) – मुलीला शाळेत सोडून व केवायसी करुन येते. असे सांगुन घरातून निघुन गेलेली 25 वर्षीय विवाहिता 6 वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाली. ही घटना 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेंदूरवादा येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पती, सासू, एक मुलगा, दोन मुलीसह शेंदुरवादा, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारी 25 वर्षीय राधा दत्ता निकम ही विवाहिता पती नोकरीला गेल्यानंतर आनंदी या मुलीला शाळेत सोडून येते व केवायसी करून येते. असे म्हणून 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरातुन मुलीसह निघुन गेली, तिचा पती 4:30 वाजता कामावरुन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तिचा व मुलगी आनंदी यांचा आजुबाजूच्या परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. तसेच तिच्या माहेरच्या नातेवाईंकांना संपर्क केला असता त्यांनीही राधा व मुलगी आमच्याकडे आली नाही असे कळविले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेऊन सुद्धा त्या मिळून आल्या नाही. याप्रकरणी दत्ता देवराव निकम यांच्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा शोध पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भागडे हे घेत आहे.
