February 5, 2026


वाळूजमहानगर, ता.7 (बातमीदार) – हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय चालक व मालक असलेल्या तरुणाची 6 लाख रुपये किमतीची पिकअप जीप चोरून नेल्याची घटना 24 ऑक्टोबर 2023 रोजी घडली होती. मात्र ती मंगरुळ ता. माजलगाव येथील नामदेव परसे याच्याकडे असल्याचे समजल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश अरूण कुंढारे (24) हा पिकअप चालक व मालक असून तो गणेशनगर मदर तेरसा शाळेजवळ वाळुज येथे आई वडीलांसह राहतो व मासेविक्री करतो. 18 जुलै 2023 रोजी बोलेरो पिकअप जिप (एम एच 20, जी सी – 4585) विकत घेतली असुन ती मच्छी वाहतुकीसाठी वापरतो. 24 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी पैठण येथील धरणात मासे पकडण्यासाठी जाळे टाकुन बोलेरो पिकअप जिप घेवुन बिडकीन मार्गे वाळुज येथे येत असताना लिंबेजळगाव येथील नदीच्या पुलाजवळ पिकअप हॉटेलच्या समोर उभी केली. व जेवण करुन अंदाजे 11.45 वाजता परत आला तेव्हा 6 लाख रूपये किंमतीची पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप जिप कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

तीचा शोध घेतला असता ती नामदेव मारोती परसे रा. मंगरुळ ता. माजलगाव जि.बीड याचेकडे असल्याची माहीती मिळाली. त्यानेच ती चोरुन नेली. याप्रकरणी गणेश कुंढारे यांच्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी मारुती परसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस आर दिलवाले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *