
वाळुज महानगर, (ता.6) – आषाढी एकादशी निमित्त देवळाली चौकातील सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून वाळुज परिसरातील छोटे पंढरपूर या ठिकाणी पायी व्यसनमुक्ती जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध जनजागृतीपर फलक हातात घेऊन व्यसनमुक्ती विषयक जनजागृती करण्यात आली. या व्यसनमुक्ती दिंडीमध्ये केंद्राचे संचालक सुनील बढे, कारभारी सोनवणे तसेच (बाबा (हिंदुस्तानी फुलंब्रीकर) डॉ. एम डी संकपाळ, समुपदेशक शिल्पा थोरात, सोशल वर्कर ऋषिकेश काकर, सागर काळे, रोशन पाटील, शशिकांत राठोड, किरण तायडे, सविता येवले, कल्पना गायकवाड यांच्यासहयात्रेमध्ये सहभागी तरुण, नागरिक, महिला यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला.
