
वाळुज महानगर, (ता.16) – वाळूज येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेत 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बालदिन अभिव्यक्ती सप्ताहमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

या सप्ताहामध्ये 7 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस म्हणून वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पथनाट्य, बालसभा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच या सप्ताहाची सांगता शेवटचा दिवस माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करून करण्यात आली. 
या सप्ताहासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाघचौरे यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका सुजाता अष्टेकर यांनीही मार्गदर्शन केले. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख नानासाहेब सुरवसे, वैशाली शेटे, शोभा सातपुते, शारदा खोत, मंगेश काष्टे, संदीप गायके, महादेव मगर, गणेश राठोड, आदेश सरसे, शारदा खोत ,ज्योत्सना चौधरी, कल्याणी कंधारकर, सीमा जमदाडे, लता कांबळे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शेटे यांनी केले तर आभार शोभा सातपुते यांनी मानले.
