
वाळूज महानगर, ता.31) – मेडिकल व इंजिनिअरींगमध्ये सातत्याने उत्तमोत्तम निकाल देणाऱ्या सरस्वती एज्युकेशनल अकॅडमी, बजाजनगरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा यशाला गवसणी घालून अकॅडमीच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
इंजिनिअरींग शिक्षणासाठी देशपातळीवर प्रतिष्ठित असलेल्या आयआयटी या संस्थेमध्ये प्रवेशाकरीता अकॅडमीमधील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यापैकी आशिष दोंथ याची आयआयटी इंदौर तर कल्पेश पाटील याची आयआयटी रोपर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली असून रोहित बनकर याची एनआयटी, भोपाळ येथे निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अकॅडमीच्या वतीने संचालक प्रा. सुनिल पाडळकर व अकॅडमीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील उज्वल भवितव्याकरीता शुभेच्छा दिल्या. नीट व जेईई परीक्षांमधील उज्वल यशा शहराप्रमाणेच बजाजनगर हे देखील एक शैक्षणिक हब बनत असल्याची भावना यावेळी विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली.
