February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – अनुसूचित जमातीची महिला लाभार्थ्यांच्या मंजूर घरकुल नाकारणाऱ्या वाळूजच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय वैजापूर येथे अर्ज दाखल केला असता न्यायलयाने त्याचा अर्ज नामंजूर केला .


याविषयी अधिक माहिती अशी की, मीना संतोष पवार या अनुसूचित जाती व जमातीचे असून यांनी वाळुज ग्रामपंचायत येथे घरकुल मिळणेबाबत अर्ज केला होता. यातील आरोपीतांनी फियार्दी हे वाळुज गावची रहिवाशी नाही व तिचे नाव चुकुन घरकुलच्या ठरावात आले, असे मासिक सभेत ठराव मंजुर केला. तसेच आरोपींनी फियार्दीची जातीवादी मानसिकतेतून बदनाम करण्यासाठी खोटी खोडसाळ माहीती लोकसेवकांना पाठवुन फियार्दीस मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले. याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून वाळूज ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नानासाहेब केशवराव मतसागर (५०), रा. प्लॉट नं.५९३ सिडको महानगर तिसगाव ता.जि. छ. संभाजीनगर ), विद्यमान ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे (४६) व वाळुजच्या सरपंच सईदा नबी पठाण (५०) रा. कमळापुर रोड वाळुज ता. गंगापुर जि.छ.संभाजीनगर. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तीवाद व बाजु ऐकून आदेशात नमुद केले की, प्रथमदर्शनी दिसुन येते की, सरपंच सईदा नबी पठाण, ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांच्याविरुध्द अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१) (१) नुसार गुन्हा केल्याचे दिसुन येत आहे. तसेच तक्रारदार महिला हिने घरकुल मिळावे म्हणुन अर्ज केल्याची पोहच न्यायालयात दाखल केलेली आहे. तसेच ती वाळुज गांवची रहिवाशी असल्याबाबत आधार कार्ड दाखल केलेले आहे. तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गंगापुर यांना ७ जानेवारी २०२२ रोजी पत्र देवुन कळविले होते की, तक्रारदाराने घरकुल मिळावे म्हणुन कोणतीही लेखी व तोंडी अर्ज व माहिती दिलेली नव्हती. या सर्व गोष्टीचा विचार करून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एम. मोहिद्दीन एम.ए., वैजापुर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर केला आहे. सरकार मार्फत फियार्दी पक्षा तर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी बाजू मांडली व त्यांना सहाय्यक म्हणुन अ‍ॅड. एस. के. दळवी व अ‍ॅड. एस. आर. गावडे यांनी काम पाहिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *