
वाळुज महानगर, (ता.22) – जिल्ह्यातील सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. अशी मागणी बी आर एस पी च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी दिलेल्या एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली की, ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी एक जण भावना समाजात रूढ झाली आहे. ही जनभावना दूर करण्यासाठी प्रशासकीय कारभारात जलद, पारदर्शक आणि गतिमान सुविधा आणण्याची नितांत गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य बजवत असताना त्यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. विशेषता तहसीलदार कार्यालय हे तालुक्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचे केंद्रस्थान असून येथे महसूल शाखा, सेतू/ नागरिक सुविधा केंद्र/ पुरवठा शाखा/ श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना शाखा यासारखे अनेक महत्त्वाचे विभाग नागरिकांशी थेट संपर्क साधतात. या कार्यालयात आणि अशाच इतर सार्वजनिक संपर्क असलेल्या सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये हे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यामुळे पारदर्शकता आणि जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवता येईल. त्यांच्या कामाची जबाबदारी निश्चित होईल, कामातील विलंब आणि अनियमितता कमी होऊन नागरिकांना मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता सुधरेल. भ्रष्टाचार निर्मूलन सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या गळ्यात ओळखपत्र असल्याने लाच खोरी किंवा गैर व्यवहार थेट अंकुश ठेवता येईल. संशयास्पद व्यवहार ओळखणे सोपे होऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल. तसेच कार्यक्षमतेत वाढ होऊन दलालाचा सुळसुळाट कमी होईल आणि नागरिकांना उत्तम सेवा नागरिकांचा विश्वास नागरिकांना जलद आणि दर्जेदार सुविधा मिळाल्याने त्याचा सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर विश्वास वाढेल आणि सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या गळ्यात ओळखपत्र असल्याने दलाल कोण व कर्मचारी अधिकारी कोण हे ओळखण्यास मदत होईल. ज्यामुळे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयाचा कारभार खऱ्या अर्थाने सक्रिय गतिमान आणि पारदर्शक बनेल आणि जनतेला जलद व भष्टाचार मुक्त सेवेचा अनुभव मिळेल तसेच जो सरकारी कर्मचारी अधिकारी गळ्यात ओळखपत्र घालणार नाही. त्याचा एक महिन्याचा पगार देता कामा नये. असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी केले. यावेळी बीआरएसपीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
