March 23, 2026

 

 

 

वाळूज महानगर, (ता.27) – दोन हजार रुपयाची लाच मागितली, त्यापैकी पाचशे रुपये यापूर्वीच स्वीकारले. मात्र उर्वरित दीड हजार रुपये स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या समन्स बजावणाऱ्या पोलीस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई रविवारी (ता.27) रोजी करण्यात आली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संतोष गिरजाराम वाघ वय 46 हा समन्स बजावण्याची ड्युटी करत होता. एका 44 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध चेक बाऊन्स प्रकरणी मा न्यायालय औरंगाबाद येथे कलम 138 नुसार दावा दाखल आहे. त्या दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेले समन्स तमील करून मा न्यायालयास तामिल रिपोर्ट सादर करण्यासाठी संतोष गिरजाराम वाघ याने तक्रारदार यांचेकडे 2000 रुपयांची मागणी करून यापूर्वीच 500 रूपये स्वीकारले होते. रविवारी (ता.27) रोजी तक्रारदार यांचेशी समन्स तामिल बाबत बोलणी करुन 1500 रुपये लाच स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या वाघ यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद करून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र काळे, पोलिस अंमलदर विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *